maharashtra

पारगाव येथून ५० हजार रुपयांच्या बॅटऱ्या चोरीस


पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने आयडिया कंपनीच्या टॉवरसाठी लागणाऱ्या ५० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने आयडिया कंपनीच्या टॉवरसाठी लागणाऱ्या ५० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ ऑक्टोंबर २०२२ रोजी ७ वाजण्यापूर्वी पारगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या आयडिया कंपनीच्या टॉवरच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. मशीन ठेवण्यासाठी वापरात असलेल्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून टॉवरसाठी लागणाऱ्या ५० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची तक्रार जगन्नाथ सलगर, रा. वाई यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली.