maharashtra

सातारा येथून मुलगा व मुलीसह महिला बेपत्ता


Woman with son and daughter missing from Satara
घर खर्चाच्या कारणावरून झालेल्या भांडणातून सातारा येथील प्रताप विद्यापीठातून मुलगा व मुलीसह एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : घर खर्चाच्या कारणावरून झालेल्या भांडणातून सातारा येथील प्रताप विद्यापीठातून मुलगा व मुलीसह एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घर खर्चा कारणावरून झालेल्या भांडणातून दि. २९ रोजी ७.३० ते ११.१५ वाजण्याच्या सुमारास फतीमा अनिल हेळवाककर, वय २६ ही महिला नर्गिस, वय २ वर्ष, मुलगी खलिफा, वय ३ वर्ष या दोघांना घेऊन कोठेतरी निघून गेली असून ती अद्याप परत आली नसल्याची तक्रार पती अनिल हेळवाककर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.