maharashtra

मोबाईलसह रोख रक्कम चोरी करणार्‍या युवकाला अटक

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे यश

Youth arrested for stealing cash with mobile phone
राजवाडा परिसरातील नगर वाचनालय येथे अंधाराचा गैरफायदा घेवून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणार्‍या युवकाला शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) अटक केली.

सातारा : राजवाडा परिसरातील नगर वाचनालय येथे अंधाराचा गैरफायदा घेवून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणार्‍या युवकाला शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) अटक केली.
सागर आबा बाबर (वय 21, रामाचा गोट. मंगळवार पेठ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही चोरीची घटना दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 10.30 वाजता घडलेली आहे. संशयिताने अंधाराचा गैरफायदा घेवून तक्रारदार यांचा मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेली. चोरीची बाब समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांना सुरुवातीला तपासात यश आले नाही. तांत्रीक तपासाला सुरुवात केल्यानंतर नुकतेच त्यांना धागेदोरे मिळाले. मंगळवार पेठेतील युवकाकडे चोरीचा मोबाईल असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी संशयिताने गुन्ह्याची कबुली देवून चोरीचा मोबाईल दिला. पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत बधे, पोलिस हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.