maharashtra

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी अमित ठाकरे आज साताऱ्यात


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे शनिवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते मनसेच्या महासंपर्क अभियानाची तयारी आणि कार्यकर्त्यांची संवाद या हेतूने येत असून यामुळे सातारा जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे शनिवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते मनसेच्या महासंपर्क अभियानाची तयारी आणि कार्यकर्त्यांची संवाद या हेतूने येत असून यामुळे सातारा जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांचे साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने त्यांचे सातारा शासकीय विश्रामगृहात स्वागत केले जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडेदहा वाजता अमित ठाकरे रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचा अभिवादन करून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करत आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर अडीच ते तीन या वेळेत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद आणि दुपारी तीन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाला भेट देतील. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांमध्ये अमित ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.