maharashtra

परळी गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा


Raid on a gambling den in Parli village
परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३३, हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

सातारा : परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३३, हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी परळी गावच्या हद्दीत जोशी दवाखान्याच्या पाठीमागे घराच्या आडोशाला नूर मोहम्मद लिगायत शेख रा. परळी, अर्जुन शिवलाल राठोड, अनिल बापूराव मोहिते दोघेही रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा आणि सुरेश लक्ष्‍मण दळवी हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३, हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.