maharashtra

सातारा शहरातून दुचाकीची चोरी


सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 ते 27 डिसेंबर दरम्यान विक्रमसिंह दिलीपसिंह रजपूत ठाकूर रा. साईराज अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा यांच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली, ते वापरत असलेली दुचाकी क्रमांक एमएच ०९ सीई 7734 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक टकले करीत आहेत.