खेळाच्या कारणावरून सातारा येथील बुधवार पेठ परिसरात एकाला मारहाण झाल्याप्रकरणी दुसऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : खेळाच्या कारणावरून सातारा येथील बुधवार पेठ परिसरात एकाला मारहाण झाल्याप्रकरणी दुसऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ एप्रिल रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बुधवार पेठ परिसरात संकेत वीरेंद्र बल्लाळ, वय २५ याला तेथीलच यश तानाजी जाधव त्याने मोबाइलवर गेम खेळण्याच्या कारणावरून दगडाने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.


