maharashtra

शंभुराज देसाईंनी गुवाहाटीत बसून हलवली सूत्रे, कारखाना केला बिनविरोध !!


Shambhuraj Desai moved to Guwahati and set up a factory without any opposition !!
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शंभुराज देसाई यांनी गुवाहाटीमध्ये बसून सातारा जिल्ह्यातील सुत्रे हलवत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपला कारखाना बिनविरोध करून दाखवला आहे.

सातारा : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत बंडखोरी करत मागच्या 6 दिवसांपासून सुरत मार्गे गुवाहाटी गाठलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढणार आहे. दरम्यान त्यांचा मुक्काम पुढचे दोन ते तीन दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शंभुराज देसाई यांनी गुवाहाटीमध्ये बसून सातारा जिल्ह्यातील सुत्रे हलवत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपला कारखाना बिनविरोध करून दाखवला आहे.
शंभुराज देसाई यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक बिनविरोध करत संचालक झाल्याने त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी गुवावाही येथील हॉटेलमध्ये अभिनंदन करण्यात आले. याबाबत स्वत: शंभुराज देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. देसाई यांनी फोटोही टाकल्याने त्यांच्यासोबत आमदार एकत्र असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान काल देसाई यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.