maharashtra

सातारा येथील भिंतीशिल्पाच्या अनावरण प्रकरणी २१ जणांवर गुन्हे


Crimes against 21 people in unveiling of wall sculptures in Satara
राजवाडा बसस्थानकांमध्ये दि. २० डिसेंबर रोजी प्रशासनाची परवानगी न घेता भिंती शिल्पाचे अनावरण केल्याप्रकरणी २१ जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात पुणे दाखल करण्यात आले असून या घटनेच्या अनुषंगाने २८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी दिली.

सातारा : येथील राजवाडा बसस्थानकांमध्ये दि. २० डिसेंबर रोजी प्रशासनाची परवानगी न घेता भिंती शिल्पाचे अनावरण केल्याप्रकरणी २१ जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात पुणे दाखल करण्यात आले असून या घटनेच्या अनुषंगाने २८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला असतानाही दि. २० डिसेंबर रोजी प्रशासनाची परवानगी न घेता भिंती शिल्पाचे अनावरण करण्यात आले होते. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई केली असतानाही या अनावरण अनुषंगाने समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित होत आहेत. या घटनेच्या अनुषंगाने कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करीत असेल तर त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून माजामध्ये तेढ निर्माण करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अभिजीत यादव यांनी दिला आहे.