maharashtra

पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत करावी

दीपाली गोडसे यांची मागणी

Fifty lakhs should be given to the family of the victim girl
पाटण तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी तसेच संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत करण्यात यावी, अशी मागणी मानव सुरक्षा सेवा संघाच्यावतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

सातारा : पाटण तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी तसेच संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत करण्यात यावी, अशी मागणी मानव सुरक्षा सेवा संघाच्यावतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे, राजू गोडसे व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक गृह सजन हंकारे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच मागणीचे निवेदन सादर केले.

यावेळी दीपाली गोडसे म्हणाल्या, पाटण तालुक्यामध्ये लहान मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करणाऱ्या आरोपीला भर चौकामध्ये उघडा करून मारहाण करावी आणि त्यानंतर लगेच त्याला फाशी देण्यात यावी, तरच असे प्रकार थांबतील आणि मुली, महिला, लहान मुले सुरक्षित राहतील. संबंधित आरोपीवर फास्टट्रॅक अंतर्गत खटला चालवावा आणि पॉक्सोअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच अशा प्रकारांमध्ये त्या-त्या वेळेस शिक्षा दिली जावी.

राजू गोडसे म्हणाले, या गंभीर प्रकरणांमध्ये वेगळा अधिकारी नेमून घटनेचा तपास करण्यात यावा तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाखांची मदत करावी, अशी आमची मागणी आहे.