maharashtra

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


सैदापूर, ता. सातारा परिसरात युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सैदापूर, ता. सातारा परिसरात युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ ऑक्टोंबर रोजी ४ वाचण्याच्या सुमारास सैदापूर परिसरात सुजल शितल बारवडे, वय १९, रा. शनिवार चौक, सातारा याने एका युवतीचा दुचाकीवरून पाठलाग केला. त्या ठिकाणी असणाऱ्या यश ढाब्या समोर सातारा - मेढा मार्गावर या गोष्टीला दुचाकी आडवी मारून तू जर माझ्याशी प्रेम संबंध ठेवले नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेतो, असे म्हणून तिचा विनयभंग केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.