बोरगाव तालुका सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात स्त्री अथवा पुरुष याचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा : बोरगाव तालुका सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात स्त्री अथवा पुरुष याचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ जुलै रोजी ६ वाजण्यापूर्वी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत इनाम कामेरी, ता. सातारा येथील नावाच्या शिवारात कृष्णा नदीच्या पात्रालगत एक अनोळखी स्त्री अथवा पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची खबर तानाजी कृष्णा पाटील यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.


