maharashtra

दुर्गंधी येत असल्याने स्मशानभूमी स्थलांतरीत करा

म्हसवे येथील समता सैनिक दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

म्हसवे ता. सातारा येथील बौध्दवस्तीनजिक नदीपात्राशेजारील मळई गट क्र. 203 चे लगत आजअखेर अस्तित्वात असणारी जी स्मशानभूमी आहे, ती बौध्दवस्तीपासून अवघ्या १00 मीटर अंतरावर आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने ही स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन म्हसवे येथील समता सैनिक दलाने जिल्हाधिकारी यांना दिले.

सातारा : म्हसवे ता. सातारा येथील बौध्दवस्तीनजिक नदीपात्राशेजारील मळई गट क्र. 203 चे लगत आजअखेर अस्तित्वात असणारी जी स्मशानभूमी आहे, ती बौध्दवस्तीपासून अवघ्या १00 मीटर अंतरावर आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने ही स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन म्हसवे येथील समता सैनिक दलाने जिल्हाधिकारी यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्यावेळी म्हसवे येथे स्मशानभूमी करण्यात येत होती त्यावेळी येथील बौध्द समाजबांधवांना विचारात न घेता करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्या गट क्र. 203 लगत नदीपात्रातील क्षेत्रात ज्या ठिकाणी बौध्द बांधव म्हसवे यांची वहिवाटीची जागा आहे, ती देखील बेकायदेशीरपणे फेरफार नं. 7143 बनविला व गट क्र. 213 हा नव्याने तयार केला. सदरचा गट क्रमांक तयार करताना बौध्द समाजातील कोणत्याही व्यक्तीस विचारात न घेता अनधिकृतपणे गट क्रमांक तयार करण्यात आला. यामुळे बौध्द बांधवांना अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. हा अन्याय तात्काळ दूर करण्यात यावा. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पारीत करण्यात याव्यात. सध्याच्या स्मशानभूमीच्या पूर्व बाजूस 500 मीटर व सध्याच्या स्माशानभूमीलगत चतु:सिमा बदलण्यात याव्यात व या ठिकाणी नव्याने स्मशानभूमी करण्यात यावी, याबाबतची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर यशपाल बनसोडे, आकाश कांबळे, अतुल डोंगरे, आकाश माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.