maharashtra

रिपाई (गवई गट)चे साताऱ्यात धरणे आंदोलन


वर्णे ग्रामपंचायतीने ध्वनी प्रदुषणाच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाजाला माईकवरून प्रार्थनेला बंदी करण्याचा ठराव केल्याच्या निषेधार्थ रिपाइं (गवई) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

सातारा : वर्णे ग्रामपंचायतीने ध्वनी प्रदुषणाच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाजाला माईकवरून प्रार्थनेला बंदी करण्याचा ठराव केल्याच्या निषेधार्थ रिपाइं (गवई) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.
यावेळी वर्णे ग्रामपंचायत बॉडी तात्काळ अपात्र करावी, सरपंच व सदस्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, ठराव केल्याप्रमाणे संपूर्ण गावातच स्पिकर बंदी लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गाडे, युथ जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, सुरज मुलाणी, आशुतोष वाघमोडे, दिपक जामदार, सिद्धार्थ गायकवाड, समीर मुलाणी, सिकंदर शेख, आब्बास शेख, फारुख मुलाणी आदींसह आंदोलक उपस्थित होते.