रिक्षात बसलेल्या एका महिलेच्या पिशवीतील ३० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात तीन अनोळखी महिलांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : रिक्षात बसलेल्या एका महिलेच्या पिशवीतील ३० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात तीन अनोळखी महिलांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ मार्च रोजी ८.३८ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील राजपुरोहित स्वीट मार्ट समोर ते अदालत वाड्याच्या अलीकडे पिसाळ आर्किटेक दरम्यान रिक्षातून जात असताना लीलावती लक्ष्मण गायकवाड, रा. आसनगाव, ता. सातारा या महिलेच्या पिशवीतील ३० हजार रुपये रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी महिलांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


