पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ज्वाला रोहित शिंदे आणि त्यांचे पती राहणार संगमनगर तालुका सातारा हे अजंठा चौक सातारा येथे गेले असता मेरानाम पितांबर शिंदे, उत्तेकर पितांबर शिंदे, अनुसन पितांबर शिंदे, म्हपाबाई पितांबर शिंदे सर्व रा. दत्तनगर, कोडोली, ता. सातारा यांनी ज्वाला शिंदे यांच्या पतीला तू दिलेली केस माघारी घे, असे म्हणत त्या दोघांना मारहाण केली. याप्रकरणी संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.


