maharashtra

अल्पवयीन मुलासह विवाहिता बेपत्ता


अल्पवयीन मुलासह विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : अल्पवयीन मुलासह विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मयुरी मंगेश जाधव वय 25 रा. मोळाचा ओढा, सातारा ही विवाहिता तिचा अडीच वर्षाचा मुलगा रुद्र मंगेश जाधव याच्यासह राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस नाईक शिंदे अधिक तपास करीत आहेत.