आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एप्रिल 2020 ते 28 फेब्रुवारी 2023 अखेर निनाद विनय कापुरे, विनय कापुरे दोघेही रा. धरणगाव ता. जळगाव यांनी लग्नाबाबत खोटी माहिती देऊन तसेच श्रीमती शिवमोहिनी रघुनाथ बगाडे रा. फलटण, ता. फलटण यांच्याकडून आठ लाख रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.


