मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 जानेवारी रोजी सात वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिवराज फाटा येथे मोहम्मद शरीफ अमीन नदाफ वय 31 राहणार लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा याने त्याच्या ताब्यातील डंपर भरधाव वेगात चालवून प्रसाद देवानंद वैशंपायन वय 26 राहणार खानाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या आयटेन कार क्रमांक एमएच ०६ सीडी 1973 ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात होऊन वैशंपायन आणि त्यांच्या पत्नीस किरकोळ दुखापत होऊन कारचे नुकसान झाले. या अपघातात डंपर मधील हौद्यात असणाऱ्या खडीवर बसलेले हुसेन मोहम्मद सहाब नदाफ वय 50 राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार जे. बी. कारळे करीत आहेत.


