दारूच्या नशेत एकाने हाताची शीर कापून घेतल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोडोली, ता. सातारा येथे घडली.
सातारा : दारूच्या नशेत एकाने हाताची शीर कापून घेतल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोडोली, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी १२. ५५ वाजण्याच्या सुमारास विनोद दादासाहेब मोरे, वय ३३, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, स्वराज्य नगर, गोडोली, ता. सातारा त्याने दारुच्या नशेत हाताची शीर कापून घेतल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खबर वनिता विनोद मोरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.


