maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधे बावी, तालुका फलटण येथे भानुदास एकनाथ उराडे पत्ता माहीत नाही व इतर आणखी तीन इस्मान समवेत वादावादी सुरू होती यावेळी बाळू पोपट सोनवलकर वय 32, राहणार दुधेबावी, तालुका फलटण यांनी मंदिरामध्ये भांडण करू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून भानुदास उराडे व इतर तिघांनी सोनवलकर यांना लोखंडी गजाने मारहाण केली. याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलीस नाईक देशमुख अधिक तपास करीत आहेत.