सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 ते 24 मार्च दरम्यान कुमार बाबुराव चोरगे, वय 62 रा. केसरकर पेठ, सातारा हे फिरण्यासाठी बाहेर गेले मात्र परत घरी न आल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसर्या घटनेत दि. 21 मार्च रोजी सहा वाजण्याच्या पूर्वी सातारा येथील अदालत वाडा परिसरात असणार्या सन हाइट्स अपार्टमेंट येथून एक तेवीस वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


