maharashtra

जिल्हा परिषद मैदानावरून दुचाकीची चोरी


जिल्हा परिषद मैदानावरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : जिल्हा परिषद मैदानावरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश सुभाष त्रिंबके राहणार गडकर आळी, सातारा यांची यामाहा कंपनीची चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम एच 05 बी टी 1556 ही अज्ञात चोरट्याने जिल्हा परिषद मैदानावरून चोरून गेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.