maharashtra

कचरावेचकांचे सातारा नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन

मानवी हक्क दिनानिमित्त कचरावेचक महिलांच्या हक्क व अधिकार यांना संरक्षण मिळण्याची मागणी

कचरा वेचण्याच्या कामामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होते. पर्यावरणात पडणारे प्लास्टिक, लोखंड, पुष्ठा, काच अशा पुनर्निर्माण होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणातून ते गोळा करतात आणि पुढे पुनर्चक्रीकरणासाठी वेगवेगळ्या भंगार दुकानात पाठवल्या जातात. त्यातून देशाच्या संसाधनांची बचत होते.

सातारा : सातारा शहरातील कचरा वेचण्याचे काम कचरावेचक पिढीजात करत आहेत. कचरा वेचण्याच्या कामामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होते. पर्यावरणात पडणारे प्लास्टिक, लोखंड, पुष्ठा, काच अशा पुनर्निर्माण होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणातून ते गोळा करतात आणि पुढे पुनर्चक्रीकरणासाठी वेगवेगळ्या भंगार दुकानात पाठवल्या जातात. त्यातून देशाच्या संसाधनांची बचत होते. ज्या वस्तू लोकांनी फेकून दिल्या आहेत, त्या वस्तू पुनर्वापरात येण्यास मदत होते.

पर्यावरण हवामान बदल व वन मंत्रालयातून तयार केलेल्या 8 एप्रिल 2016 च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार आम्हाला स्थानिक प्रशासनाने कचरा वेचण्याच्या कामांमध्ये, तसेच घनकचऱ्याचे संकलन दारोदारी जाऊन गोळा करण्याची यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिलेले असताना आम्हाला स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या कामात सामावून घेत नाही. यातून आम्हाला आमच्या अधिकारांचे, हक्कांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. भीक नको, दान नको, हक्क हवा याप्रमाणे आमच्या अधिकारात असणारे काम व आमचा अनुभव आपल्या प्रशासनाला घनकचरा व्यवस्थापनात सहकाऱ्याची भूमिका निभावेल.

सातारा शहरातील कचरा वेचक महिलांनी जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर या दिवसाच्या निमित्ताने सातारा नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी चांदणी ताई मोरे, सुनिता घाडगे, रेखा वाघमारे, संगीता चव्हाण इत्यादी कचरावेचक महिला व महिला सक्षमीकरण प्रकल्प व घनकचरा प्रकल्प समन्वयक अभिजित जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेश मोहिते व कचरावेचक महिला उपस्थित होत्या.