maharashtra

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघा अज्ञातांवर गुन्हा


दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघा अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघा अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गैरसमज करुन तीन अनोळखी संशयित आरोपींनी दोघांना मारहाण केली. पोवई नाक्यावर भर रस्त्यावर अनोळखी युवकांनी राडा केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयित टोळक्याने लोखंडी रॉडने डोक्यात व दगडाने तोंडावर मारहाण केली आहे. याप्रकरणी सयाजी मारुती धनवे (वय 42, रा. सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार सयाजी धनवे व त्यांचा मित्र मयुर विभुते जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.