maharashtra

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा


Three charged in child molestation case
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातार्‍यातील एका उपनगरात अवघ्या 10 वर्षाच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. संशयित मुले 16 वर्षाखालील असल्याचे समोर येत आहे.