maharashtra

राहत्या घरातून युवक बेपत्ता


राहत्या घरातून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : राहत्या घरातून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आफताब चांद शेख वय 19 रा. शनिवार पेठ, सातारा हा युवक दिनांक 10 फेब्रुवारी रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.