सातारा शहरातील एका वकिलाला धमकी दिली. याप्रकरणी माजी नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे याच्यासह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ३ रोजी घडली आहे. याबाबत अॅड. मोहिद्दीन अकबर शेख यांनी तक्रार दिलेली आहे.
सातारा : सातारा शहरातील एका वकिलाला धमकी दिली. याप्रकरणी माजी नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे याच्यासह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ३ रोजी घडली आहे. याबाबत अॅड. मोहिद्दीन अकबर शेख यांनी तक्रार दिलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहिद्दीन अकबर शेख वय ४९, रा. गुरुवार पेठ, पटवर्धन गॅरेजशेजारी, सातारा यांना रात्रीच्या वेळी घरासमोर येवून बाळू उर्फ विनोद खंदारे रा. मल्हारपेठ, सातारा व अन्य अनोळखींनी काणेकर यांची केस घेतलीस, तू केस घेवू नको, तुला जड जाईल, अशी धमकी दिली. तर एका अनोळखीने हिंदू मुस्लीम भांडणाचा प्रकार करुन तुला संपवीन अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अॅड. मोहिद्दीन शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मते करत आहेत.


