maharashtra

खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून शहीद अशोक कामटे यांना अभिवादन


26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेला हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरूपाचा हल्ला होता. मात्र घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना जिगरबाज सुरक्षा यंत्रणांनी दमदार प्रत्युत्तर दिले.

सातारा : 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्याचा जीव तोडून मुकाबला करणाऱ्या शहिदांना सातारा शहरांमध्ये अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक अशोक कामटे यांना कॅम्प सदर बाजार येथील शहीद अशोक कामटे स्मृती उद्यानामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
उदयनराजे यांनी कामटे यांच्या स्मृतिनिमित्त तेथे एक समई पेटविली. 26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेला हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरूपाचा हल्ला होता. मात्र घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना जिगरबाज सुरक्षा यंत्रणांनी दमदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णनं, पोलीस निरीक्षक विजय साळस्कर, पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. अशा जिगरबाज आणि क्रांतिकारक वीरांचे यथोचित स्मरण करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीने निश्चितच जपायला हवा, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
उदयनराजे यांनी येथील दिवंगत शहीद अशोक कामटे उद्यानास आज भेट दिली आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक विनीत पाटील, प्रीतम कळसकर, संजय शिंदे, वैभव पोतदार, सारंग पोतदार आदी उपस्थित होते.