maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा


एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 मार्च रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास शेंद्रे तालुका सातारा गावच्या हद्दीतील म्हावशे गॅस एजन्सी समोर, पुणे-कोल्हापूर सर्व्हिस रस्त्यावर सुरज सुहास जावळे राहणार वेचले तालुका सातारा हा त्याच्या दुचाकी क्रमांक एमएच 11 बीपी 9847 वरून घरी परत येत असताना एका अज्ञात जेसीबी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील जेसीबी घेऊन जावळे यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात जावळे यांचे निधन झाले असून अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मेणकर करीत आहेत.