दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सेव्हन स्टार बिल्डिंग, सदर बाजार, सातारा येथील फुटपाथवर शितल गणेश साळुंखे रा. बुधवार नाका, शाहूपुरी, सातारा याने अजय अवताडे रा. गोडोली, सातारा याला दिलेले दोन लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून अजय अवताडे याने शितल साळुंखे यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार मेतकर करीत आहेत.


