माण तालुक्यातील जांभुळणी येथील आरोपी आगणु रामु काळेल, (वय-५०) यास मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी पुरावा ग्राह्य धरून आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
वडूज : माण तालुक्यातील जांभुळणी येथील आरोपी आगणु रामु काळेल, (वय-५०) यास मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी पुरावा ग्राह्य धरून आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी की, तारखेस व ठिकाणी गेले चार महिन्यापासुन दि. २२ ऑक्टोबर २०१५ रोजीपर्यंत आरोपी आगणु रामु काळेल रा. जांभुळणी ता. माण याने पिडीत मतीमंद मुलगी हिच्यावर अत्याचार केले होते. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पिडीत मतीमंद मुलगी ही गरोदर झाली होती. त्याप्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा म्हसवड पोलीस स्टेशन येथे दि. २३ ऑक्टोबर २०१५ रोजी नोंद करण्यात आला होता.
या केसकामी केसचे अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि बाजीराव ढेकळे, यांनी मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांनी केला. त्यांनी या गुन्ह्यातील महत्वाचे साक्षीदारांचे जबाब नोंदविले, वैद्यकीय पुरावा व इतर कागदोपत्री पुरावा जमा केला. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केले. सखोल तपास करुन आरोपीविरुध्द जिल्हा न्यायालय, वडूज येथे दोषारोप दाखल केले. वडूज येथिल जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकार पक्षाच्या वतीने सहा.जिल्हा सरकारी वकील व्ही. एच. काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये 11 साक्षीदार सरकार पक्षाच्यावतीने तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैदयकीय पुरावा आणि सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून आगणु रामु काळेल, (वय-५० रा. जांभुळणी, ता. माण, जि. सातारा) याला १० वर्षे सक्तमजुरी व दंड रु. २० हजार व दंड न भरलेस सहा महिने ज्यादा शिक्षा व दंड रकमेपैकी १५ हजार रुपये पिडीत मतीमंद मुलीस नुकसान भरपाई म्हणुन देण्याची शिक्षा दिली.
याकामी सरकारी वकील यांना म्हसवड पोलीसचे प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पो.कॉ. अक्षय शिंदे, तसेच पो हवा दत्तात्रय जाधव, महिला.पो.हवा. दडस, पो.कॉ. जयवंत शिंदे, पो.कॉ. सागर सजगणे यांनी सहकार्य केले.


