maharashtra

कोयना जलविद्युत टप्पा एक व दोनच्या उल्लोळ विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे

गळती बंद करण्याच्या उपाय योजना प्रस्तावित

कोयना जलविद्युत टप्पा क्रमांक एक व दोनच्या आपत्कालीन झडप भुयार येथील 62 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उल्लोळ विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत या गळतीचे अन्वेषण करण्यात आले असून ही गळती बंद करण्याच्या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कोयना जलविद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

सातारा : कोयना जलविद्युत टप्पा क्रमांक एक व दोनच्या आपत्कालीन झडप भुयार येथील 62 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उल्लोळ विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत या गळतीचे अन्वेषण करण्यात आले असून ही गळती बंद करण्याच्या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कोयना जलविद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी विद्युत निर्मिती करिता जे पाणी नवजा टावरमधून अधिजल भुयार किंवा हे ड्रेस टनेल मार्गे निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. यावेळी पासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते ही सर्ज वेल 1960 मध्ये बांधून पूर्ण झाली आहे. ती कातळामध्ये 100 मीटर खोल खोदले आहे. त्याला अर्धा मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण करण्यात आले आहे. ही विहीर गेली 60 वर्षे तिथे असून अनेक भूकंपाचे धक्के या विहिरीने पचवले आहेत. मात्र काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे या विहिरी मधून झिरपलेले पाणी इमर्जन्सी वॉल टनेल किंवा आपत्कालीन झडपे द्वारे भुयारामध्ये जाते.  तिथून ते वाहन डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते वीजगृहाला जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही.रुस्तीसाठी वीज निर्मिती बंद ठेवावी लागेल. द्यस्थितीमध्ये गळतीचे अन्वेषण झाले असून ही गळती बंद करण्याची उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली आहे त्याप्रमाणे टेंडर प्रक्रिया सुद्धा प्रगतीपथावर आहे त्यामुळे या संदर्भात कोणीही काळजी करण्याचे कारण नाही असे प्रतिक्रिया जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी दिली आहे.