maharashtra

जिल्ह्यातील चार जुगार अड्ड्यांवर छापे

सुमारे 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Raids on four gambling dens in the district
जिल्ह्यातील चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सातारा : जिल्ह्यातील चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातील फलटण येथील बरड येथे शुगर घेत असलेल्या संपत खंडू लोंढे वय 47 रा. बरड, तालुका फलटण आणि चंदन काकडे रा. फलटण यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 5422 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
दुसर्‍या घटनेत वारुंजी गावच्या हद्दीत पाटण तिकाटणे फाटा येथील चिकनच्या दुकानाच्या शेजारी नारायण जिजाबा नाईक राहणार शनिवार पेठ कराड हे जुगार घेताना आढळून आल्याने त्यांच्यावर कराड शहर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 1985 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
तिसर्‍या घटनेत वारुंजी फाटा येथील गणपती मंदिरा जवळील पान टपरी शेजारी चंदन दगडू बडेकर वय 28 राहणार मुंढे, तालुका कराड हा जुगार घेताना आढळून आल्याने त्याच्यावर कराड शहर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून 1795 रुपये किमतीचे जुगार चे साहित्य हस्तगत केले आहे.
चौथ्या घटनेत वारुंजी फाटा येथील नवरंग स्टीलच्या शेजारी असणार्‍या पान शॉप च्या आडोशाला जब्बार इकबाल सय्यद वय 47, राहणार गोटे, तालुका कराड हा जुगार घेताना आढळून आल्याने त्याच्यावर कराड शहर पोलिसांनी कारवाई करून 1855 किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे.