maharashtra

आमिर मुजावर आणि सात साथीदारांविरुद्ध मोका अंतर्गत धडक कारवाई

पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा कार्यभार स्वीकारताच दणका

सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अमीर इम्तियाज मुजावर आणि त्याच्या सात साथीदारांना मोक्का लागू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच संघटित गुन्हेगारीच्या विरोधात मोक्का कारवाईचे शस्त्र उपसले आहे.

सातारा : सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अमीर इम्तियाज मुजावर आणि त्याच्या सात साथीदारांना मोक्का लागू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच संघटित गुन्हेगारीच्या विरोधात मोक्का कारवाईचे शस्त्र उपसले आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना या संदर्भातील सूचना करण्यात आल्या आहेत.
अमीर इम्तियाज मुजावर वय 22 राहणार पिरवाडी, अमीर सलीम शेख राहणार वनवासवाडी, अभिषेक राजू भिसे वय 20 राहणार काळे वस्ती झोपडपट्टी सातारा, आहद शेख, ओमकार राजू भिसे राहणार काळे वस्ती मोळाचा ओढा-सैदापुर, संग्राम विजय जाधव भक्तवडी तालुका कोरेगाव, यश सुभाष साळुंखे राहणार मोळाचा ओढा, आयुब अत्तार 426 शनिवार पेठ यांच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 4 ऑक्टोबर रोजी यश संजय बिडकर राहणार व्यंकटपुरा हा त्याच्या मित्रांसमवेत सेंट पॉल हायस्कूल येथे दांडिया खेळण्यास गेला होता. दांडिया खेळून ते सर्वजण गेट समोरील रोडवर जात असताना अभिजीत भिसे याने यश बिडकर यांचा मित्र सर्वेश महाडिक यांच्या पायावर गाडी घातली. त्यावेळी आरोपी अभिजीत भिसे यांच्या गाडीवर मागे बसलेला आरोपी अमीर शेख आणि यश बिडकर व त्यांचे मित्र यांच्यात बाचाबाची झाली म्हणून आरोपी अमीर शेख, अभिजीत भिसे, साहिल सावंत, सहद आतार व विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यात जोरात भांडणे झाली होती.
 सेंट पॉल हायस्कूल सातारा येथे बाचाबाची झाल्याच्या कारणावरून चिडून दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बेकायदा जमाव जमवून दोन मोटरसायकल वरून मनामती चौक ढोणे कॉलनी मंगळवार पेठ येथे यश उभा असताना आमिर शेख याने फिर्यादीकडे बघून आज तुला सुट्टी देत नाही, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली, फिर्यादीने चलाखीने खाली वाकल्यामुळे नेम चुकला. तेथे हजर असलेले साथीदार घडशी काका यांनी आरोपी अमीर शेख यास असे करू नका, असे सांगत असताना आमिर शेख याने पुन्हा डोक्याला पिस्तूल लावून शूट करतो असे म्हणून पिस्तुलाचा खटका दाबला परंतु मिस फायर झाला. त्यावेळी अभिजीत भिसे राहणार यश ढाब्याच्या पाठीमागे, साहिल सावंत राहणार कोटेश्वर मंदिराजवळ आहद शेख यांने ठोक त्याला असे म्हणून ओरडत होते व विधी संघर्षीत बालक हा हातामध्ये मोठा लांब कोयता घेऊन बिडकर याला मारण्यासाठी धावला. मात्र लोकांनी त्याला पकडले. यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासानंतर टोळीप्रमुख अमीर इम्तियाज मुजावर याने कट रचून गुन्हा करण्याकामी एम नावाची टोळी सदस्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी याबाबतची माहिती संकलित करून तसा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना सादर केला होता. या प्रस्तावाला संजय येनपुरे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुजावर टोळीला मोक्का लावण्याचे आदेश महानिरिक्षकांच्या सूचनेनंतर दिले. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.