maharashtra

हजारमाची येथे रिक्षा जाळून ५० हजार रुपयांचे नुकसान


Rs 50,000 loss due to burning of rickshaw at Hazaramachi
हजारमाची, तालुका कराड येथे पूर्ववैमनस्यातून एकाला शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या मालकीची रिक्षा जाळून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : हजारमाची, तालुका कराड येथे पूर्ववैमनस्यातून एकाला शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या मालकीची रिक्षा जाळून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ एप्रिल रोजी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान हजारमाची येथे कुमार रामचंद्र काजवे, सौ निर्मला उर्फ काजल कुमार काजल या दाम्पत्याने पूर्ववैमनस्यातून तेथीलच अविष्कार बजरंग भागवत
यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्या मालकीची रिक्षा क्रमांक एम.एच. बीके ६३०३ जाळून 50 हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.