दवाखान्यातून पंधरा हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : दवाखान्यातून पंधरा हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. अजय विजय वाडले वय 31, राहणार प्रतापगंज पेठ, सातारा यांची नेले, ता. सातारा येथे ओपीडी आहे. दिनांक 15 ते 16 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या ओपीडीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ओपीडी मधील असलेल्या टेबलाच्या ड्रॉवर मधील पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक फौजदार देशमाने अधिक तपास करीत आहेत.


