maharashtra

अवैध गुटखा वाहतुकीवर शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई

दोघांना अटक; 4 लाख 7 हजार 440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्व जिल्हयामध्ये रंगपंचमी सणाच्या अनुशंगाने आपआपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाकाबंदी लावुन वाहने व संशयीत इसम चेक करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.

सातारा : सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थांची विक्री व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंदयांबाबत माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
दि. 12 रोजी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्व जिल्हयामध्ये रंगपंचमी सणाच्या अनुशंगाने आपआपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाकाबंदी लावुन वाहने व संशयीत इसम चेक करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व त्यांच्या सोबत सहा.फौजदार शरद भोसले, पोहवा विजय भिंगारदेवे, पोहवा अजित कर्णे व होमगार्ड स्टाफ असे बोगदा, सातारा या ठिकाणी नाकाबंदी करीत असताना रात्री 2.25 वा.चे सुमारास बोगदा बाजुने एक वेरणा कार येत असताना दिसली. ही कार पोलीस स्टाफ थांबवित असताना त्याने त्याचे कारचा वेग वाढवला. परंतु नाकाबंदी करीत असलेल्या पोलीस स्टाफने कार थांबवुन कारचालक व त्याच्या ताब्यातील कारची पाहणी केली असता त्यामध्ये एकुण 24 हजार 200 रुपयांचा अवैध गुटखा मिळुन आल्याने हा गुटखा व कार आणि मोबाईल असा 2 लाख 34 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर इसमांचे विरुध्द शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं. 75/2023 भादविसंक. 328,272,273,34 प्रमाणे कारवाई करण्यात आली.
त्यांनतर या संशयीत इसमाकडे शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफने गुटख्याच्या आणखी साठ्याबाबत विचारपुस करीत होते. परंतु तो असमाधानकारक व उडवा-उडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याच्याकडे स्टाफने कौशल्याने विचारपुस केली असता त्याने सदरचा साठा हा कर्नाटक राज्यातुन आणल्याची व उर्वरीत साठा हा जकातवाडी, ता. जि. सातारा येथे त्याचा दुसरा साथिदार याच्याकडे ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर या माहितीच्या आधारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी त्याच्या दुसऱ्या साथिदारास ताब्यात घेवुन त्याच्या घरातुन सुमारे तब्बल 1 लाख 73 हजार 240 रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त केला आहे. त्यानंतर या गुन्हयाच्या तपासकामी दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता त्यांची दि. 15 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे करीत आहेत.
अशा प्रकारे शाहुपुरी पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान अवैध गुटख्याची वाहतुक करणारी कार पकडुन व त्यातील संशयीत इसमाकडे विचारपुस करुन त्याने दिलेल्या माहितीचे आधारे जकातवाडी, ता. जि. सातारा येथे छापा टाकुन एकुण 1 लाख 97 हजार 440 रुपयांचा गुटखा व 2 लाख रुपयांची कार आणि मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 4 लाख 7 हजार 440 रुपयांचा ऐवज जप्त करुन 2 इसमांना जेरबंद केले आहे.  
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला, सहा. फौजदार शरद भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भिंगारदेवे, अजित कर्णे, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार व होमगार्ड महाडीक, इंगळे, देशमुख, घोरपडे यांनी केली आहे.