maharashtra

हातावर कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime on one hand for beating with a scythe
किर्दतवाडी, ता. सातारा येथे एकाच्या हातावर लोखंडी कोयत्याने मारहाण करून त्याला जखमी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : किर्दतवाडी, ता. सातारा येथे एकाच्या हातावर लोखंडी कोयत्याने मारहाण करून त्याला जखमी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ मार्च रोजी १० वाजण्याच्या सुमारास किर्दतवाडी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून तेथीलच कल्याण अण्णा किर्दत याने अशोक नामदेव मोरे यांच्या डोक्यात व डाव्या हातावर लोखंडी कोयत्याने मारहाण करून तुला खोट्या केसमध्ये अडकवतो, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.