अस्तित्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आलेल्या देगाव, ता. वाई येथील एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : अस्तित्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आलेल्या देगाव, ता. वाई येथील एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ फेब्रुवारी रोजी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास किसनवीर कारखाना ते जांब, ता. वाई गावच्या हद्दीत चिकने बारलगत भिंतीचा आडोशाला अशोक मोहन जाधव, रा. देगाव, ता. वाई हा आपले अस्तित्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल रविराज वर्णेकर यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी अशोक जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


