maharashtra

बोंडारवाडी धरणासाठी सुवर्णकन्या कादंबरीची धाव


Suvarnakanya Kadambari run for Bondarwadi dam
राज्यस्तरीय ॲथलेटीक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली आसनी गावची सुवर्णकन्या कादंबरी मोहन शेलार ही बोंडारवाडी धरणासाठी रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान केळघर- गवडी- मामुर्डी- मेढा दरम्यान अशी धावली. कादंबरीच्या या अभिनव उपक्रमाचे बोंडारवाडी धरण कृती समितीने जाहीर कौतुक केले.

मेढा : राज्यस्तरीय ॲथलेटीक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली आसनी गावची सुवर्णकन्या कादंबरी मोहन शेलार ही बोंडारवाडी धरणासाठी रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान केळघर- गवडी- मामुर्डी- मेढा दरम्यान अशी धावली. कादंबरीच्या या अभिनव उपक्रमाचे बोंडारवाडी धरण कृती समितीने जाहीर कौतुक केले.
कादंबरीने धावण्याची सुरुवात सकाळी ८ वाजता केली. केळघर येथे कृती समितीचे आदिनाथ ओंबळे, श्रीरंग बैलकर, जगन्नाथ जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवला. कादंबरी सोबत यावेळी वीस-पंचवीस जणांनी देखील धाव घेतली. केळघर ते मेढा यामधील प्रत्येक गावातील लोकांनी कादंबरी आणि तिच्यासोबत धावणाऱ्या सर्व सहकारी धावपटूंचे टाळ्यांच्या कडकडाटात औक्षण करून आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. 
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार यांनी कादंबरी व अन्य सहभागी धावपटूना शुभेच्छा दिल्या. केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राने  रुग्णवाहिका उपलब्ध करून आरोग्य सेवा पुरवली. यावेळी विनोद पार्टे, विनोद शिंगटे, बजरंग चौधरी, विलास शिर्के, उषा उंबरकर, बाळू धनावडे, मोहन जगताप, आदिनाथ ओंबळे व केळघर ते मेढा परिसरातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.