maharashtra

कार- दुचाकीच्या धडकेत एकजण ठार


दहिवडी-फलटण रस्त्यावर माऊली मंगल कार्यलयानजीक झालेल्या कार व दुचाकी आपघातात महिबुब दाऊतभाई मुलाणी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक सागर लालासो भगत (रा. हडपसर पुणे) यांच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : दहिवडी-फलटण रस्त्यावर माऊली मंगल कार्यलयानजीक झालेल्या कार व दुचाकी आपघातात महिबुब दाऊतभाई मुलाणी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक सागर लालासो भगत (रा. हडपसर पुणे) यांच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत फैयाज जहांगिर मुलाणी वय 43 रा. दहिवडी यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 डिसेंबर रोजी मुलाणी पिता-पुत्र दुचाकीवरुन निघाले असताना दहिवडीकडून फलटणच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या वॅगनर कारने समोरुन दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक जाहांगीर किरकोळ जखमी झाले, तर गंभीर जखमी झालेल्या महिबुब यांचा मृत्यू झाला. तपास हवालदार बी. एस. खांडेकर करत आहेत.