maharashtra

गौण खनिजची चोरी केल्याप्रकरणी केळघर येथील एकावर गुन्हा

सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना आढळला

गौण खनिजची चोरी केल्याप्रकरणी केळघर, ता. जावली येथील सचिन विष्णू विरामणे याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना तो आढळून आला.

सातारा : गौण खनिजची चोरी केल्याप्रकरणी केळघर, ता. जावली येथील सचिन विष्णू विरामणे याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाताना तो आढळून आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ नोव्हेंबर रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास केळकर गावच्या हद्दीत वेण्णा नदीच्या पात्रात सचिन विरामने हा गौण खनिजची चोरी करताना आढळून आला. त्याच्याकडे दगड गोटे ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याची तक्रार मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.