maharashtra

जावयाची सासर्‍याला मारहाण; गुन्हा दाखल


जावई आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याप्रकरणी या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : जावई आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याप्रकरणी या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जानेवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सदर बाजार, सातारा येथील गुलाब भिकू साठे वय 86 यांना तेथेच राहणारे त्यांचे जावई प्रल्हाद सर्जेराव जाधव आणि त्यांचा मुलगा सनी प्रल्हाद जाधव यांनी जळण टाकू नका असे म्हणाल्याचा राग येऊन गुलाब साठे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.