स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांची संयुक्त धडाकेबाज कारवाई
4 लाख 95 हजार 570 रुपये किंमतीचा अवैध गुटखा हस्तगत
गोडोली, ता. सातारा येथील प्रिती हॉटेल समोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे 4 लाख 95 हजार 570 रुपये किमतीचे अमली पदार्थ (महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आर. एम. डी .व विमल पान मसाला आणि तंबाखू) हस्तगत केले.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथील प्रिती हॉटेल समोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे 4 लाख 95 हजार 570 रुपये किमतीचे अमली पदार्थ (महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आर. एम. डी .व विमल पान मसाला आणि तंबाखू) हस्तगत केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गणेश बबनराव यादव, वय 38, रा. भैरोबा मंदिरासमोर, पालखी चौक, गोडोली, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी 2.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती मिळाली, गोडोली, ता. सातारा येथील प्रिती हॉटेल समोर गणेश बबनराव यादव यांनी अमली पदार्थांचा साठा केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना करून छापा टाकण्यास सांगितले. पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता त्याठिकाणी मोठा अमली पदार्थाचा साठा निदर्शनास आला. 89 हजार 700 रुपये किमतीचा आर. एम. डी. पानमसाला, 45 हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, 70 हजार 686 रुपये किमतीचा विमल पान मसाला, 12 हजार 276 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, 1 लाख 96 हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला, 7 हजार 260 रुपये किमतीची साधी तंबाखू, 15 हजार 390 रुपये किमतीची तंबाखू आणि 17 हजार 72 रुपये किमतीचा हिरा पान मसाला व अन्य अमली पदार्थ असा एकूण 4 लाख 95 हजार 570 रुपये किमतीचा मुद्देमालआढळून आल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रोहन राजेंद्रकुमार शहा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. गणेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.
या कारवाईत पोलीस हवालदार संजय शिर्के, शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रवीण फडतरे, पोलीस नाईक मुनीर मुल्ला, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मोहसीन मोमीन, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला.


