maharashtra

जिल्हा बँकेमार्फत कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या घराच्या स्मारक नुतनीकरनासाठी आर्थिक मदत !


बाळ सीताराम मर्ढेकर हे अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी तसेच नवकविता व नवटीका ह्यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते.

सातारा : बा.सी. मर्ढेकर ही साहित्य क्षेत्रातील सातारा जिल्ह्याची मोठी ओळख आहे. सातारा तालुक्यातील मर्ढे गाव हे त्यांच्या नावाने ओळखले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच सर्वसामान्य, शेतकरी यांचे हिताचे दृष्टीने कामकाज करत असून सामाजिक बांधिलकीचा वारसा चालू ठेवत बँकने कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या घराच्या स्मारकाचे नुतनीकरणासाठी रक्कम रु. 2 लाखाचा धनादेश महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी, साताराचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचेकडे बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते तसेच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, सुनील खात्री, रामराव लेंभे, ज्ञानदेव रांजणे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका सौ. ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे तसेच मान्यवरांचे उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.
याप्रसंगी आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, बाळ सीताराम मर्ढेकर हे अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी तसेच नवकविता व नवटीका ह्यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. सातारा शहरापासून उत्तरेला 20 किमी अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावर बा. सी. मर्ढेकर यांचे मर्ढे हे मूळ गाव आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यामध्ये 319 शाखा, 65 एटीएम, मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे. बँक आज तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली असून विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत असून याचाच एक भाग म्हणून कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या घराच्या स्मारक नुतनीकरनासाठी बँकेने 2 लाखाची आर्थिक मदत केलेली आहे.
आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, नवकवितेचे जनक म्हणून बा.सी.मर्ढेकर यांची ओळख अजरामर झाली आहे. नवकवितेचे जनक बा.सी. मर्ढेकर यांच्या पडक्या घराच्या उभारणीसाठी आणि त्या घराचे स्मारकात रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखेने पुढाकार घेतला आहे. शाहुपुरी शाखेच्या या कार्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2 लाख रुपयांची भरघोस मदत केली आहे. बा.सी. मर्ढेकर यांचे दिमाखदार स्मारक शाहुपुरी शाखा उभे राहील, असा विश्वास यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असून सातारा जिल्हा बँकेच्या स्थापनेत यशवंतराव चव्हाण साहेबांचे बहुमोल योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत कृषी व सहकार क्षेत्रातील कार्य बँक आज तळमळीने व निष्ठेने करीत असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध प्रकारे अर्थसहाय्य करुन बँकेने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
यावेळी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेचे संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येयधोरणे बँक प्रभावीपणे राबवीत असल्याने बँकेने देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या प्रत्येक वेळी जिल्हा बँकेने नेहमीच पुढाकर घेवून आर्थिक हातभार लावला आहे.
बा.सी. मर्ढेकर ही साहित्य क्षेत्रातील सातारा जिल्ह्याची मोठी ओळख आहे. सातारा तालुक्यातील मर्ढे गाव हे त्यांच्या नावाने ओळखले जाते. मर्ढे गावाचा विकास करण्यासाठी बा.सी. मर्ढेकर यांचे नाव आणि कार्य महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने बा.सी. मर्ढेकर यांचे स्मारक उभे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र बा.सी. मर्ढेकर यांचे वडिलोपार्जित घर नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. भविष्यात बा.सी. मर्ढेकर यांचे घर येथे होते असे सांगण्याची वेळ आली असती, त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी हे घर पुन्हा आहे तसे उभे करण्याचा निर्धार केला. त्यानुसार घराचे कामही सुरु करण्यात आले आहे. सातारा जिल्हा बँक समाजउपयोगी विविध योजनांना नेहमीच मदत करीत असते. बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारकास बँकेने मदत केलेबद्दल विनोद कुलकर्णी यांनी बँकेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.