maharashtra

दरोड्याच्या पूर्व तयारीतील एकाला अटक

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाचे यश

दरोड्याच्या पूर्व तयारीतील एकाला अटक करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.

सातारा : दरोड्याच्या पूर्व तयारीतील एकाला अटक करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विविध गुन्ह्यात हवे असलेले आणि फरार असलेले संशयित जेरबंद करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वनाथ घोडके व त्यांचे पथक तपास करीत असताना त्यांना दि. १४ रोजी माहिती मिळाली, दरोड्याच्या  पूर्वतयारीतील आणि दोन वर्षापासून फरार असलेला शंकर उर्फ रोनिक दऱ्या भोसले हा जिहे, ता. सातारा येथील घरी लपून बसला आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने फरारी पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला जेरबंद केले.