पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सहा जून 2022 ते आजपर्यंत बुशा गरज्या पटले रा. आगरी पाडा, पोस्ट कारकदा धडगाव जिल्हा नंदुरबार याने 2022-23 या गळीत हंगामासाठी स्वराज इंडिया अॅग्रो लिमिटेड, उपळवे, ता. फलटण येथे ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून औचित्रा बापू रणवरे रा. शिंदे नगर, तालुका फलटण यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन कोणीही ऊस तोडणी कामगार न देता आणि रणवरे यांचे पैसेही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पटले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. भोसले करीत आहेत.


