maharashtra

शिक्षकावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल


Pokso case filed against teacher for molestation
सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका खाजगी शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला दुसरीच्या वर्गात बोलावून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. गंभीरे (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका खाजगी शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला दुसरीच्या वर्गात बोलावून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. गंभीरे (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी १०. ३० वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका खाजगी शाळेतील शिक्षक गंभीरे याने त्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीला इयत्ता दुसरीच्या वर्गात बोलावुन, दरवाजा बंद करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार त्या मुलीच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही.