maharashtra

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ते 4 नोव्हेंबर 2022 दरम्यान शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी हिना शाहरुख जमादार सध्या राहणार मंगळवार पेठ, सातारा या विवाहितेने पती शाहरुख निजाम जमादार, सासरे निजाम अजीज जमादार, सासू नसीमा निजाम जमादार यांच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.